प्रवास हा कधी जवळचा असतो तर कधी दूरचा. तो करायचा म्हटलं तर सोपा हि नसतो आणि कठीणही. मग स्वराज्याचे स्वप्न पाहणे आणि ते प्रत्यक्षात साकार करणे किती अवघड गोष्ट आहे.
परंतु हे स्वप्न नुसते पाहिले नाहीतर प्रत्यक्षात ते स्थापन केले. आपल्या तेजस्वी पुत्राच्या हातून रयतेचे स्वराज्य स्थापन करणाऱ्या राजमाता जिजाऊंनी. १२ जानेवारी १५९८ रोजी राजे लखुजी जाधव व म्हाळसाबाई यांना झालेलं हे कन्यारत्न.
त्यांच्याच जन्मभूमीचा अर्थात सिंदखेडराजा येथील घेतलेला हा मागोवा.