पुणे, नगर व ठाणे या जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेला अभेद्य व अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड. भटक्यांची पंढरी अथवा दुर्गपंढरी असा नावलैकिक मिळवलेला हा किल्ला एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करतो याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड.
ऋतू कोणताही असो परंतु पावसाळ्यात गडाचं सौंदर्य अधिकच खुलत.
गडावर जाणारी नळीची वाट व माकडनाळ या सगळ्यात आव्हानात्मक अशा वाटा प्रस्तारोहन करूनच केल्या जातात.
सगळ्यात सोपी वाट पाचनई गावातून आहे. माळशेज घटवून खिरेश्वर मार्गे गडावर जाता येते.
साधले घाट हा नळीच्या वाटेसारखाच खडतर मार्गाचा प्रवास आहे. गडावरील सर्वात आकर्षण असलेला परिसर म्हणजे कोकणकडा. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच याचे विराट रूप पाहावे लागते.
गडावर केदारेश्वराची लेणी आहे. लेणीच्या मध्यभागी भली मोठी पिंड व चार बाजूला खांब आहेत. त्यापैकी तीन खांब तुटलेले आहेत. पिंडीच्या सभोताली संपूर्ण पाणी साठलेले असते.
गडावर मुख्य पुरातन असे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. संपूर्ण मद्निरावर सुबक नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या बाजूलाच पिण्याचे पाण्याचे कुंड व गुहा आहेत.
मंदिराच्या समोरच पुष्करणी तलाव व त्यातील कोनाड्यात असलेल्या देवीदेवतांच्या मूर्ती पाहता येतात.
मंदिराच्या वरच्या बाजूला काही लेण्या आहेत ज्या तारामती टोकाच्या पोटात खोदलेल्या पाहायला भेटतात.
खिरेश्वरमार्गे आल्यास गडावरील सर्वात उंच भाग लागतो तो म्हणजे गडाचा बालेकिल्ला.
गड व्यवस्थित पाहायचा झाल्यास २-३ दिवस लागतात.