दुर्गवारी - प्रवास सह्याद्रीचा
गडकिल्ले, मंदिरे, लेण्या, समुद्रकिनारे सुंदर निसर्गस्थळे यांचा फोटो, माहिती, लेख, व्हिडिओच्या माध्यमातून मागोवादुर्गवारी – गेली २० वर्षांपासून महाराष्ट्रात भटकंती करत आहे. सह्याद्रीच्या कुशीतील असंख्य गडकिल्ले, लेणी, तीर्थक्षेत्रे, घाट रस्ते, डोंगरवाटा असंख्यवेळा तुडवल्या आहेत. सह्याद्रीतील हि दुर्गरत्ने, नैसर्गिक सौंदर्यस्थळे अनेक वर्षे पाहून झाल्यावर महाराष्ट्राचा हा अनमोल खजिना जगालाही कळला पाहिजे. त्यांनाही तो अनुभवता आला पाहिजे, या विचारातून मग फोटो, व्हिडीओ यांच्या रूपात सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आपल्यासमोर आणायचे ठरवले परंतु त्याला एक विशेष नाव असणे गरजेचे होते. मग प्रवास सुरु झाला तो दुर्गवारी या नावाचा.
असंख्य नावांचा यासाठी विचार केला गेला. यात प्रामुख्याने भटकंती, भ्रमंती, फिरस्ते, महाराष्ट्र देशा, दुर्गांच्या देशा, सफरनामा, दुर्ग भरारी, दुर्गवेडे, सह्याद्रीप्रेमी यापैकी एखादे नाव असावे असे वाटत होते. परंतु हि नावे यापूर्वीच अनेक ठिकाणी वापरलेली आहेत. म्हणून मग एक आगळंवेगळं नाव जे फारस कोणी वापरलं नाही अशा नावाचा विचार केला गेला.
पंढरीची वारीतील वारी या शब्दाला विशेष महत्व आहे. आपणही सह्याद्रीची नेहमी वारी करत असतो मग नावात वारी असणे खूप आवश्यक वाटू लागले. सह्याद्रीची वारी, सह्यभटकंती, अशी नावे फारशी जवळची वाटत नव्हती. शेवटी गडकिल्ले हे जास्तीत जास्त या वारीत येत असल्यामुळे दुर्गवारी हे नाव सर्व मित्रांच्या सल्याने पक्के ठरले. त्यात हि सोशल मीडियाच्या माध्यमात कोणी वापरले नव्हते.
शेवटी १९ फेब्रुवारी २०१६ ला दुर्गवारी हे नाव युट्युब, फेसबूक, ब्लॉग, इंस्टाग्राम या सगळ्यासाठी फायनल झाले.
या सगळ्या व्यासपीठावर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, कलात्मक, सांस्कृतिक घडामोडीचे दर्शन दुर्गवारी करत आहे.
पुढे याच दुर्गवारीची स्वतःची वेबसाईट असावी जिथं गडकिल्ले, तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे यांची सविस्तर माहिती, जाण्याचा मार्ग, राहण्याची सोय या विषयी मार्गदर्शन होईल, म्हणून मग वेबसाईटची निर्मिती करण्यात आली.आपण उत्तम प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद !